मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण दुखापतीमुळे रिषभ पंत या सामन्यातून बाहेर झाल्याचे म्हटले जात आहे.
या सामन्यात जेव्हा लोकेश राहुल यष्टीरक्षणासाठी आला तेव्हा साऱ्यांनाच पंत कुठे आहे, हा प्रश्न पडला होता. पण गेल्या काही मिनिटांमध्येच पंत दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याच्याजागी राहुल हा यष्टरक्षण करेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली होती.
फलंदाजी करत असताना एक चेंडू पंतच्या हॅल्मेटवर आदळला होता. यावेळी पंतला दुखापत झाल्याचे म्हटले गेले. सध्याच्या घडीला पंत हा डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत.
वानखेडेवर घुमला सचिन... सचिन...चा नारा, व्हिडीओ झाला वायरलभारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती पत्करून सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण तरीही सचिनची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वानखेडेवर झालेल्या सामन्यात सचिन... सचिन...चा नारा घुमत होता. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.
भारताच्या पहिल्या सामन्यात १२१ धावांचे रहस्य आहे तरी काय, वाचा आणि विचार करा...भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा करता आल्या. पण भारताच्या या डावात १२१ धावांचे एक रहस्य आहे. हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का...
भारताच्या रोहित शर्माने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण तो १० धावांवर बाद झाला. रोहित जेव्हा बाद झाला तेव्हा संघाच्या १३ धावा झाल्या होत्या. त्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. राहुल बाद झाल्यावर ही भागीदारी संपुष्टात आली. त्यावेळी भारताच्या झाल्या होत्या १३४ धावा. त्यामुळे धवन आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली होती.
राहुल बाद झाल्यावर भारतीय फलंदाज ठराविक फकराने बाद होत गेले. भारताची मधळी फळी तर यावेळी कुचकामी ठरल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे भारताला २५५ धावा करता आल्या. या सामन्यात एकेकाळी भारताची १ बाद १३४ अशी भक्कम स्थिती होती आणि भारतीय संघ सर्वबाद झाला २५५ धावांवर. हे जर गणित तुम्ही पाहिले तर भारताने आपले ९ फलंदाज १२१ धावांमध्येच गमावल्याचे पाहायला मिळाले.