Join us  

India Vs Australia : टीम इंडियाला ऑल राऊंडर हवा?; हार्दिक पांड्या म्हणतो... गोलंदाजी कधी करीन माहीत नाही!

अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात हार्दिक व रवींद्र जडेजा यांनी स्थान पटकावले होते, परंतु हार्दिक केवळ फलंदाजाच्या भूमिकेत दिसला. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिसनी गोलंदाजीत निभावलेली भूमिका टीम इंडियासाठी हार्दिककडून अपेक्षित होती.

By स्वदेश घाणेकर | Published: November 28, 2020 8:51 AM

Open in App
ठळक मुद्देटीम इंडियाच्या गोलंदाजांना पहिल्या वन डेत अपयशक्षेत्ररक्षणातील चुकांचाही बसला फटका, अष्टपैलू खेळाडूची जाणवली उणीव

India Vs Australia : टीम इंडियाला शुक्रवारी पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया ८ बाद ३०८ धावांपर्यंतच मजल मारू शकली. शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) वगळता टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनी निराश केलं. त्यात भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका महागात पडल्या. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला सर्वाधिक उणीव जाणवली असेल ती एका ऑल राऊंडरची...  सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) ती उणीव बोलून दाखवली. पण, गोलंदाजी कधी करीन हे मीही सांगू शकत नाही, असे हार्दिकनं शुक्रवारी स्पष्ट केलं.

बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिकने शुक्रवारी पुनरागमन केलं. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही हार्दिकनं गोलंदाजी केली नाही. त्यावरूनही अनेक प्रश्न विचारले गेले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही हार्दिक केवळ फलंदाजाच्या भूमिकेत दिसला. टीम इंडियाचे अन्य गोलंदाज महागडे ठरत असताना हार्दिकचा पर्याय उपलब्ध असता तर कदाचित ऑसींच्या धावगतीला रोखता आले असते. पण, हार्दिक गोलंदाजी का करत नाही? 

हार्दिकच्या lower-back injuryवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्यातून सावरल्यानंतर त्यानं कमबॅक केलं. पण, सध्यातरी गोलंदाजी करणार नसल्याचे हार्दिकनं स्पष्ट केलं. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हे लक्ष्य असल्याचे त्यानं सांगितलं.''ही एक प्रक्रिया आहे. मी दीर्घकालीन लक्ष्याचा विचार करत आहे आणइ त्यासाठी मला गोलंदाजी करताना १०० टक्के तंदुरुस्त व्हायचे आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप येत आहे आणि त्याशिवाय अनेक महत्त्वाच्या मालिका आहेत. त्यामुळे शॉर्ट टर्म लक्ष्य ठेवून मला स्वतःला दमवून घ्यायचं नाही. कदाचित मला पुन्हा दुखापत होऊ शकते.''

''मी नेमकी गोलंदाजी कधी करेन, हेच सांगू शकत नाही. पण, प्रक्रिया सुरू आहे आणि नेट्समध्ये मी गोलंदाजी करतोय. पण, गोलंदाजी करण्यासाठी मी अजूनही पूर्णपणे तयार नाही. आंतरराष्ट्रीय लेव्हलवर गोलंदाजी करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास अजून आलेला नाही,''असेही हार्दिक म्हणाला.  

 ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की 

फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली.  वॉर्नर ६९ धावा करून माघारी परतला.  फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था ४ बाद १०१ धावा अशी झाली होती. पण,  हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावा जोडल्या. धवन ७४ धावांवर माघारी परतला. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार खेचून ९० धावांवर बाद झाला. वन डे क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. अॅडम झम्पानं ५४ धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनं ५३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहार्दिक पांड्याविराट कोहली