कोरोना व्हायरसच्या संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं भविष्य टांगणीला लागलेलं असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बुधवारी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप झाल्यास टीम इंडिया ऑक्टोबरमध्येच ऑस्ट्रेलियात दाखल होईल. भारतानं 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमानांना पराभूत करून इतिहास रचला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियान ती मालिका 2-1 अशी जिंकली होती. त्याचा वचपा काढण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 3 डिसेंबरला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडिलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर क्रिकेटची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीनं होणार आहे. 21 नोव्हेंबरला वाका येथे ही कसोटी खेळवण्यात येईल.
टीम इंडियानं 2018-19 च्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर 2-1 असे पराभूत केले होते. पण, त्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे तगडे फलंदाज संघात नव्हते. चेंडू कुरतडण्याप्रकरणी त्यांच्यावर एका वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आता होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजांचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे.
असं असेल वेळापत्रक
वि. अफगाणिस्तान, वाका, 21 नोव्हेंबरवि. भारत, गॅबा, 3 डिसेंबरवि. भारत, अॅडलेड, 11 डिसेंबरवि. भारत, मेलबर्न, 26 डिसेंबरवि. भारत, सिडनी, 3 जानेवारी 2021
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा
शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा
Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...
ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद
ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022पर्यंत स्थगित होणार?; ICCच्या सूत्रांची माहिती
... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी!
आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा!