Join us  

India vs Australia, 3rd Test : अजिंक्यनं दिलेला धक्का जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला घरचा रस्ता दाखवला

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचे दडपण अन्य फलंदाजांवर प्रकर्षानं जाणवलं.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2020 12:28 PM

Open in App

India vs Australia Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कमबॅक करताना यजमान ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ( Ajinkya Rahane) भारतीय संघानं चार सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले. गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेताना अजिंक्यनं त्याच्या नेतृत्वाचे कौशल्य दाखवले. भारतानं हा सामना ८ विकेट राखून जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. टीम इंडियानं दिलेला हा धक्का ऑस्ट्रेलियाच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यांनी उर्वरित कसोटीतून सलामीवीराच संघाबाहेर केले.

डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचे दडपण अन्य फलंदाजांवर प्रकर्षानं जाणवलं. त्यामुळेच दुसऱ्या कसोटीत त्यांचा पहिला डाव १९५ आणि दुसरा डाव २०० धावांवर गडगडला. भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. जो बर्न्स ( Joe Burns) आणि मॅथ्यू वेड ( Mathew Wade) यांनी संघाला साजेशी सुरूवात करून दिली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं उर्वरित दोन कसोटींत विजय मिळवण्यासाठी मोठा बदल केला. त्यांनी जो बर्न्सला बाहेरचा रस्ता दाखवला. डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) यांचे संघात पुनरागमन झाले आहे. बर्न्सला चार डावांत अनुक्रमे ८, ५१, ० आणि ४ धावा करता आल्या. तिसऱ्या कसोटीत वॉर्नर संघात खेळण्याची शक्यता बळावली आहे. दुखापतीमुळे तो ट्वेंटी-20 मालिकेसह पहिल्या दोन कसोटी सामन्यांनाही मुकला होता. पुकोव्हस्कीही पदार्पणासाठी सज्ज होता, परंतु सराव सामन्यात त्याच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि त्याला माघार घ्यावी लागली. आता तोही तिसऱ्या कसोटीतून पदार्पण करण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाज सिन अॅबोट ( Sean Abbott) याचेही संघात पुनरागमन झाले आहे.

तिसऱ्या कसोटीत वॉर्नर-पुकोव्हस्की ही जोडी सलामीला दिसण्याची शक्यता आहे.   ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ - टीम पेन, सीन अॅबोट, पॅट कमिन्स, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हीस हेड, मोईसेस हेन्रीक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड , डेव्हिड वॉर्नर े

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नर