ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या ८ बाद ३०८ धावा६६ चेंडूंत १०५ धावा चोपणारा स्टीव्हन स्मिथ ठरला मॅन ऑफ दी मॅचअॅरोन फिंचचीही शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक
India vs Australia : ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये सुखावलेल्या टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा पराभव होत असताना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा डेव्हिड वॉर्नर ( David Warner Butta Bomma Step) डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
लॉकडाऊनच्या काळात वॉर्नरच्या अनेक TikTok व्हिडीओनी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केलं. अख्ख वॉर्नर कुटुंबीय TikTokवर फेमस झालं. पण, भारतात टीकटॉकवर बंदी आली अन् वॉर्नरला भारतीय चाहत्यांना गमवावे लागले. वॉर्नरनं तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध गाणं बुट्टू बोम्मावर केलेला डान्स तुफान व्हायरल झाला होता. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर त्याची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियवर येण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यांच्या आग्रहास्तव वॉर्नर नाचला...
पाहा व्हिडीओ...
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की
फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था ४ बाद १०१ धावा अशी झाली होती. पण, हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावा जोडल्या. धवन ७४ धावांवर माघारी परतला. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार खेचून ९० धावांवर बाद झाला. वन डे क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. अॅडम झम्पानं ५४ धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनं ५३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या.
Web Title: India vs Australia : David Warner brings out ‘Butta Bomma’ step while fielding in the first ODI, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.