IND vs AUS Match Viewership Record: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाक सामना चांगलाच चर्चेत होता. अपेक्षेप्रमाणे साखळी फेरीतील भारत-पााक लढतीला चांगली ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रमी प्रेक्षकवर्गही मिळाला. पण दुबईच्या मैदानातील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने प्रेक्षकसंख्येचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज लढतीपेक्षाही अधिक लोकांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सेमी फायनलचा आनंद घेतल्याची माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देश विदेशातील चाहत्यांनी विक्रमी संख्येनं पाहिला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुबईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चांगली मॅच झाली. भारतीय संघानं ४ विकेट्स राखून या सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. देश विदेशातील क्रिकेट चाहत्यांनी लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफार्म JioHotstar च्या माध्यमातून या सामन्याला पसंती दिली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ६६.९ कोटी लोकांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा आनंद घेतला आहे. हा आकडा भारत-पाक यांच्यातील लढतीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान एका नव्या विक्रमाची नोंद झालीये.
... अन् भारत-पाक यांच्यातील सामन्यात सेट झालेला विक्रम मोडला
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात झाल्यावर २३ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत रंगल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. यासह यजमानांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. या सामन्यात किंग कोहलीनं शतकी खेळी केली होती. भारत-पाक सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. JioHotstar या सामन्याचा ६०.२ कोटी लोकांनी आनंद घेतला होता. हा रेकॉर्ड भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत मोडीत निघाला. फायनलमध्ये हा आकडा आणखी वाढू शकतो. कारण आहे भारतीय संघ फायनल खेळणार आहे.
भारतीय संघाने कांगारूंना पराभूत करून दाखवलं
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास करत सातत्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आड येणारा मोठा अडथळाच दूर केलाय. १४ वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघ सातत्याने नॉकआउट स्पर्धेत भारतीय संघाच्या वाटेतील अडथळा ठरताना दिसले. यावेळी भारतीय संघानं तो अडथळा पार करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय.