India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या टीम इंडियानं दडपणाखाली खेळ केला आणि त्यामुळे त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. हा सामना पाहण्यासाठी एक खास व्यक्ती थेट दक्षिण आफ्रिकेहून आला होता. तिच्यासाठी त्यानं राष्ट्रीय कर्तव्यातून सुट्टी घेतली. त्याच्या या कृतीचं सर्वांना कौतुक केलं आणि त्याच्या उपस्थितीमुळेच कदाचीत तिनं आपल्या दमदार खेळीनं सर्वांना जिंकलं.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं फटकेबाजी केली. हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह हिलीनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या. हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान आहे. मूनी ७८ धावांवर नाबार राहिली. मूनीनं ५४ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. स्पर्धेत आतापर्यंत तुफानी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला दडपणात अपयश आले. त्यानंतर आलेली तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. जेमिमा रॉड्रीग्ज ( ०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( ४ ) यांनाही जेस जॉनासेननं बाद केले. स्मृती मानधनाचे अपयशाचे सत्र अंतिम सामन्यातही कायम राहिले. टीम इंडिया ९९ धावांवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं ८५ धावांनी सामना जिंकला. ऑसींनी ८६ हजार १७४ प्रेक्षकांच्या साक्षींनं पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. या सामन्यात ७५ धावांची खेळी करणाऱ्या हिलीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
पतीच्या प्रेमाला तिची अशी दाद...अॅलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याची पत्नी. आपल्या पत्नीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात याची देही याची डोळा पाहण्यासाठी स्टार्क दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून मेलबर्नमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियन संघ आफ्रिकेत वन डे मालिकेसाठी गेला होता आणि मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी होणार होता. तो सोडून स्टार्क शुक्रवारीच मेलबर्नसाठी रवाना झाला होता. आज स्टेडियममधील त्याची उपस्थिती हिलीचे मनोबल उंचावणारी ठरली. स्टार्कच्या उपस्थितीत तिनं धमाकेदार खेळी केली.
View this post on InstagramA post shared by ICC T20 World Cup (@t20worldcup) on
भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...
ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाचं नेमकं काय चुकलं?
विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान
अॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला
'या' दोन मोठ्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या, अन्यथा....
ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी