ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल मार्शच्या जागी स्टीव्ह स्मिथला संधीटीम इंडियासाठी शिखर धवनसह मयांक अग्रवाल सलामीला खेळणार
India Vs Australia : भारतीय संघ तब्बत ८-९ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या कट्टर प्रतिस्पर्धीसमोर खेळताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा 'जोश' आणखी वाढलेला पाहायला मिळतो. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला वन डे सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले आणि वर्तुळ करून उभे राहिले. त्यांच्या या कृतीची चर्चा रंगली.
नाणेफेकीनंतर कोण काय म्हणालं?
अॅरोन फिंच - चाहत्यांच्या उपस्थितित क्रिकेट परतल्याचा आनंद वाटत आहे. संघात एकच बदल आहे. मिचेल मार्शच्या जागी स्टीव्ह स्मिथ अंतिम ११ मध्ये परतला आहे. खेळपट्टी चांगली आहे आणि आशा करतो की आम्ही आव्हानात्मक लक्ष्य उभं करण्यात यशस्वी ठरू.
विराट कोहली - संघ म्हणून चांगली सुरुवात करणे हे महत्त्वाचे आहे. आजच्या सामन्यात शिखर धवनच्या जोडीला मयांक अग्रवाल सलामीला येणार आहे. मनीष पांडे, शुबमन गिल, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन हे आजच्या सामन्याला मुकणार आहेत.
Playing XIs:
भारताचा संघ - शिखर धवन, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
ऑस्ट्रेलियाचा संघ - डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, मार्कस स्टॉयनिस, अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड
टॉस पूर्वी दोन्ही संघांनी काय केलं?
वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला.
Web Title: India Vs Australia : India & Australia teams made a barefoot circle together ahead of the first ODI against racism, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.