ठळक मुद्देबॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आजपासून सुरू झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. चेतेश्वर पुजाराने केलेली शतकी खेळी, त्याला मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांच्याकडून मिळालेली सुरेख साथ यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 303 धावा फटकावल्या
सिडनी - बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आजपासून सुरू झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. जबरदरस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराने केलेली शतकी खेळी, त्याला मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांच्याकडून मिळालेली सुरेख साथ यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 303 धावा फटकावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 130 आणि हनुमा विहारी 39 धावांवर खेळत होते. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाने सिडनी कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र भारतीय भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. खराब फॉर्ममध्ये असलेला लोकेश राहुल 9 धावा काढून हेझलवू़डच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मात्र या मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराने मयांक अग्रवालच्यासाथीने भारताचा डाव सावरला. पुजाराच्या तुलनेत अग्रवाल अधिक आक्रमक फलंदाजी करत होता. दरम्यान दोघांनीही उपाहारापर्यंत संघाला 1 बाद 69 अशी मजल मारून दिली.
उपाहारानंतर मयांक अग्रवालने आक्रमक पवित्रा घेतला. मात्र नाथन लायनला उत्तुंग षटकार ठोकण्याच्या नादात तो बाद झाला. मयांक अग्रवालने 77 धावा फटकावल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे विशेष छाप पाडू शकले नाहीत. विराट कोहली 23 आणि अजिंक्य रहाणे माघारी परतले. मात्र चेतेश्वर पुजाराने एक बाजू लावून धरली. त्याने या मालिकेतील तिसरे आणि कसोटी कारकीर्दीतील 17 वे शतक ठोकताना भारतीय संघाला सुस्थितीत आणले.
पुजाराने शेवटच्या सत्रान हनुमा विहारीसोबत 75 धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 4 बाद 303 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलिकाकडून हेझलवूडने 2 तर लायन आणि स्टार्कने प्रत्येकी एक बळी टिपला.
Web Title: India vs Australia: India scored 303 for four on 1st day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.