- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर )
वन डे मालिका गमावल्यानंतर भारताने जोरदार मुसंडीसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियात पराभवानंतर विजयी पथावर पोहोचणे कठीण असते. तथापि यूएईत आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंनी संघाला विजयी ट्रॅकवर आणले. यजमान संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे क्रिकेटतज्ज्ञ अयाझ मेमन यांनी सादर केलेले रिपोर्ट कार्ड...
विराट कोहली (८/१०): फलंदाजीत टॉप फाॅर्म सुरूच. भरपूर धावा काढल्या.कर्णधार या नात्याने आक्रमकता सिद्ध केली.
शिखर धवन (५/१०) : चांगल्या लयमध्ये असताना भरपूर धावा काढू शकला असता. मात्र सुरुवातीचा लाभ घेऊ शकला नाही.
लोकेश राहुल(५/१०) : सलामीवीर धवनसारखीच स्थिती राहिली.अखेरच्या सामन्यात अपयशी ठरल्याने भारताला क्लीन स्वीपमध्ये अपयश आले.
श्रेयस अय्यर (३.५/१०) : दोनदा संधी मिळूनही अपयशी. अखेरच्या सामन्यात शून्यावर बाद. मैदानी क्षेत्ररक्षणात मात्र दमदार कामगिरी.
संजू सॅमसन(४/१०) : चांगला फॉर्म होता. तिन्ही सामन्यात चांगल्या सुरुवाती नंतरही पुरेसे योगदान देण्यात अपयश.मैदानी क्षेत्ररक्षण मात्र उत्कृष्ट होते.
मनीष पांडे (२/१०) : एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. तरीही अपयश. अनेक दावेदार असल्याने संघात स्थान टिकवणे सोपे होणार नाही.
हार्दिक पंड्या (७.५/१०) : या प्रकारात धडाकेबाज कामगिरी सुरुच. दुसरा सामना आणि मालिका विजयाचा शिल्पकार. विश्व क्रिकेटमधील मोजक्या फिनिशर्सपैकी एक.
रवींद्र जडेजा (६/१०) : पहिल्या सामन्यात नाबाद ४४ धावांच्या बळावर यजमानांपुढे आव्हान उभे केले. डोक्याला जखम झाल्याने गोलंदाजी करू शकला नाही. बळी घेण्यात आलेले अपयश हा चिंतेचा विषय.
वाॅशिंग्टन सुंदर (६.५/१०) : सडपातळ बांधा असलेल्या या फिरकी गोलंदाजाने नियंत्रित आणि टीच्चून मारा केला. डावाच्या सुरुवातीचा मारा फारच प्रभावी ठरला. फलंदाजीवर लक्ष देणे गरजेचे आहे.
दीपक चाहर (४/१०) : लेट स्विंग सर्वांत प्रभावी शस्त्र.नियंत्रित मारा नसल्याने भरपूर धावा मोजल्या. अखेरचा फलंदाज या नात्याने फलंदाजी सुधारण्याची गरज.
युजवेंद्र चहल (४/१०) : पहिल्या सामन्यात जडेजाच्या जागी बदली खेळाडू म्हणून मॅचविनर ठरला.त्यानंतर मात्र जादू संपली. अनेक प्रयोग केल्याने भरपूर धावा मोजल्या.
शार्दुल ठाकूर (४/१०) : उत्कृष्ट मारा करणारा गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी. पाटा खेळपट्ट्यांवर मात्र फटका बसला. प्रती षटके दहा धावा दिल्या.
मोहम्मद शमी (२/१०) : पहिल्या सामन्यात दिशाहीन मारा. चार षटकात ४६ धावा मोजल्या. कसोटी मालिका लक्षात घेऊन विश्रांती देण्यात आली.
टी नटराजन (८/१०) : पदार्पणात या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने सर्वोत्कृष्ट मारा करीत लक्ष वेधले. नियंत्रित गोलंदाजी आणि प्रभावी यॉर्कर या बळावर फलंदाजांना घाम फोडला. भारतीय संघासाठी या मालिकेत गवसलेला हा खेळाडू आहे.
Web Title: India vs Australia: India's dominance in T20 remains in Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.