भारताच्या सलामी जोडीवर असणार सर्वाधिक लक्ष

२६ डिसेंबरला होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ भारत-आॅस्ट्रे लिया कसोटी सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:23 AM2018-12-25T04:23:01+5:302018-12-25T04:23:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : India's top-order batting | भारताच्या सलामी जोडीवर असणार सर्वाधिक लक्ष

भारताच्या सलामी जोडीवर असणार सर्वाधिक लक्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
२६ डिसेंबरला होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ भारत-आॅस्ट्रे लिया कसोटी सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने, हा तिसरा सामना जिंकून आघाडी कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताने पहिला सामना थोडक्यात जिंकला, तर आॅस्ट्रे लियाने दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकला. त्यामुळे विजयाची लय माझ्यामते आॅस्टेÑलियाकडे आहे. त्यामुळे भारताला खूप जबाबदारीने आणि सांभाळून खेळावे लागेल. यासाठी सर्वप्रथम भारताला संघ नियोजन व्यवस्थित करावे लागेल. त्याचबरोबर, मैदानावर चांगली कामगिरीही करावी लागेल. भारताला हा सामना कसाही करून जिंकावाच लागेल. कारण हा सामना गमावला, तर आॅस्ट्रे लिया या मालिकेत पराभूत होणार नाही हे निश्चित. जर आॅस्ट्रे लियाने ही मालिका अनिर्णित राखली, तरी त्यांच्यासाठी हा मोठा विजय ठरेल.ऑ

संघ निवडीविषयी म्हणायचे झाल्यास, हा विषय भारतासाठी खूप वादाचा ठरला आहे. दुसºया सामन्यात अंतिम संघातून वगळण्यात आलेला रवींद्र जडेजा तंदुरुस्त नसल्याचे वृत्त सध्या मिळत आहे. त्यामुळेच तो तंदुरुस्त नसताना त्याला १३ सदस्यांच्या भारतीय संघात का निवडले गेले होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जर तो खरोखरच दुखापतग्रस्त होता, तर सामन्यात त्याला १२वा खेळाडू म्हणून पाठविण्याची गरज तरी होती का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने म्हटले की, जडेजा रणजी सामन्यादरम्यान पूर्ण तंदुरुस्त होता. शिवाय बीसीसीआयने आता अधिकृतरीत्या जडेजा तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी जर या सामन्यासाठी रविचंद्रन अश्विन तंदुरुस्त झाला, तर जडेजाची संधी हुकू शकते. नाहीतर जडेजा नक्की खेळेल असे दिसत आहे. त्यामुळेच सध्या एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, जडेजाचा संघात समावेश का केला होता?

संघनिवडीचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, भारतीय डावाची सुरुवात कोण करणार? कारण आतापर्यंत भारताची सलामी जोडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मुरली विजय, लोकेश राहुल चार डावांत काहीच करू शकले नाही. आॅस्ट्रे लियाच्या पर्थ कसोटीतील यशाचे कारण त्यांचे सलामीवीर ठरले होते. त्यामुळेच आता मयांक अग्रवालला संधी मिळणार का आणि त्याला संधी मिळाली, तर त्याच्यासह विजय, राहुल की रोहित शर्मा खेळणार हे पाहावे लागेल. आतापर्यंत कोणतीही पक्की बातमी मिळालेली नाही. त्यामुळेच सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. मालिकेतील नाजूक स्थितीवर मयांक कसोटीत पदार्पण करू शकतो. तो फॉर्ममध्येही आहे. त्याच्यासह विजयला संधी मिळू शकते, पण दुसरा विचार केल्यास रोहितचीही निवड होऊ शकते.

संपूर्ण संघाविषयी सांगायचे झाल्यास एक फिरकीपटू भारत नक्की खेळवेल. अश्विन व जडेजा पहिले दोन पर्याय आहेत, पण भारताला पूर्ण लक्ष ठेवून खेळावे लागेल. कोहली फलंदाज म्हणून जबरदस्त आहे, पण एक कर्णधार म्हणून वादात राहिला आहे. त्याला आक्रमकतेने फायदा होत असेल, तर नक्कीच हे चांगले आहे, पण एक कर्णधार म्हणून त्याला संपूर्ण संघाचा विचार करायचा आहे.

Web Title: India vs Australia : India's top-order batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.