विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-20 सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूंत 16 धावांची गरज होती. त्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने 19व्या षटकात अचूक गोलंदाजी केली. या षटकात बुमराने भेदक मारा करत फक्त दोन धावा देत दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बुमराच्या या षटकातील तिखट माऱ्यामुळेच हा सामना भारत जिंकणार, अशी आशा चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती.
जेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 12 चेंडूंत 16 धावांची गरज होती. तेव्हा हा सामना भारताच्या हातून निसटला, असे काही जणांना वाटले होते. त्यावेळी बुमराने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला. खेळपट्टीवरील दोन्ही फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. हे षटक टाकताना नेमके डोक्यात काय चालत होते, याबद्दल बुमराने आपले मत या व्हिडीओमध्ये व्यक्त केले आहे.
हा पाहा खास व्हीडीओ
अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मोलाचेहे षटक टाकताना काही गोष्टी माझ्या मनात होत्या. पण यावेळी संघातील अनुभवी खेळाडूंनी मला चांगले मार्गदर्शन केले. महेंद्रसिंग धोनी, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच मला रणनीतीची योग्य अंमलबजावणी करता आली, असे बुमराने सांगितले.
जस्प्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिध्द केले. पण, त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही भारताला विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियाने हातातोंडाशी आलेला घास भारताकडून हिसकावून घेतला. बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी बुमराने तीन विकेट घेत एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर अश्विन याच्यानंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.
127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. पण, या सामन्यात तीन विकेट्स घेत बुमराहने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली.