India vs Australia, 1st T20I : प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीला केवळ ११ धावाच जोडता आल्या. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या अफलातून यॉर्करनं गब्बरचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन ( १) माघारी परतला. त्यानंतर सातव्या षटकात मिचेल स्वेप्सननं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. स्वेप्सननं स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा ( ९) झेल टिपला. लोकेश राहुलनं ३७ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 तील १२वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानं आजच्या खेळीसह एका विक्रमाला गवसणी घालताना विराट कोहलीशी बरोबरी केली.
जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरले. संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फलंदाज आज भारताच्या लाईनअपमध्ये आहेत. मोहम्मद शमी, टी नटराजन व दीपक चहर हे ३ जलदगती गोलंदाज असतील. लोकेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण केल्या. त्यान ३९ डावांतमध्ये हा पल्ला गाठला आणि विराट कोहलीसह बाबार आझम, अॅरोन फिंच यांनीही ३९ डावांत १५०० धावा पूर्ण केल्या होत्या.
दरम्यान, संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. भारताला ८६ धावांवर तिसरा धक्का बसला.