ऍडलेड- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या मालिकेच्या पाचव्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. भारतीय संघानं या मालिकेत 31 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला होता. बुमरानं पंतकरवी पॅनला झेलबाद केलं आहे. त्यानंतर आता शामीनंही स्टार्कचा बळी घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता 93 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाला भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला होता. चार बाद 104 वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर ट्रॅव्हीस हेडच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर शॉन मार्श आणि टीम पेन यांनी सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. दरम्यान, बुमराने शॉन मार्शची (60) विकेट काढत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर चिवट फलंदाजी करत असलेल्या टीम पेनलाही (41) माघारी धाडत बुमाराने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र कांगारूंच्या शेपटाने चिवट झुंज दिल्याने भारताचा विजय लांबला. 121 चेंडूत 28 धावांची सावध खेळी करणाऱ्या पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कच्या साथीने 41 आणि नाथन लायनच्या साथीने 31 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरीस बुमरानेच कमिन्सचा अडथळा दूर केला. Live Updates:
टीम इंडिया 31 धावांनी विजयी, मालिकेत 1-0नं आघाडीवर
- ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, मोहम्मद शमीनं स्टार्कचा मिळवला बळी
- ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, बुमरानं मिळवला पॅनचा बळी