India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली. अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून देताना मजबूत पाया रचला. स्टीव्हन स्मिथ ( Steve Smith) आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी करून धावांचा डोंगर उभा केला. त्यात ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी म्हणजे सोने पे सुहागा. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) खिंड लढवत आहे. पण, सामना सुरु असताना भारतीय चाहत्यानं ऑस्ट्रेलियन सपोर्टर महिलेला चक्क प्रपोज केलं. पुढे काय घडलं ते पाहा....
वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. फिंचनं ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. स्मिथ व लाबुशेन यांनी मधल्या षटकांत केलेली खेळी मंत्रमुग्ध करणारी ठरली. त्यानं ६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकार खेचून तो १०४ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलची चौकार-षटकाराच्या आतषबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी हतबल केलं. कशीही गोलंदाजी करा मॅक्सवेलनं अतरंगी फटक्यानं सडेतोड उत्तर दिले. लाबुशेन ६१ चेंडूंत ७० धावा करून माघारी परतला. मॅक्सवेलनं २९ चेंडूंत नाबाद ६३ धावा केल्या. ऑस्टेलियानं ४ बाद ३८९ धावा चोपल्या.
प्रत्युत्तरात मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु जोश हेझलवूड पुन्हा एकदा कर्दनकाळ ठरला. त्यानं ५८ धावांची ही भागीदारी तोडताना धवनला ( ३०) बाद केले. अग्रवालही ( २८) पुढच्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर विराट एकहाती खिंड लढवत आहे.
Web Title: India vs Australia : Marriage proposal in SCG and she said "Yes", watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.