मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीमधला मॅच फिनिशर गवसल्याचे म्हटले गेले. कारण दुसऱ्या सामन्याक भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले आणि त्यानंतर तो लवकर बाद झाला. पण एमएस धोनीने मात्र अखेरपर्यंत किल्ला लढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. धोनीने 2012 साली कर्णधारपदी असताना भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2012 सालीही धोनीने भारताच्या विजावर शिक्कामोर्तब केले होते. आता तिसऱ्या सामन्यापूर्वी धोनीने फलंदाजीचा कसून सराव केला.
पाहा हा खास व्हिडीओ
महेंद्रसिंग धोनी 2009 साली भारताचा कर्णधार होता. त्यावेळी तो एवढ्या भन्नाट फॉर्मात होता की, गोलंदाजांना तो सळो की पळो करून सोडत होता. 2009 साली धोनी 771 गुणांसह अव्वल फलंदाज ठरला होता. यावेळी त्याने ख्रिस गेल, रिकी पॉन्टिंग, युवराज सिंग, माईक हसी, मोहम्मद युसूफ या नामांकित फलंदाजांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता.