Join us  

India vs Australia : धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान

... त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 2:45 PM

Open in App

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रांची या छोट्याश्या शहराला ओळख मिळवून दिली ती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने. भारताचा तिसरा सामना रांचीला होणार आहे. रांचीला आल्यापासून धोनी एकदम मस्तीमध्ये वावरत असल्याचे दिसत आहे. कारण हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले. आता तर धोनीने टीम इंडियाला  'लिट्टी-चोखा' पार्टी दिल्याचेही समोर आले आहे.

बुधवारी रात्री धोनीने आपल्या सात एकराच्या फार्म हाऊसमध्ये टीम इंडियाला पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पार्टीमध्ये खास पदार्थ होता तो 'लिट्टी-चोखा'. उत्तर प्रदेश, झारखंड या भागांमध्ये 'लिट्टी-चोखा'हा पदार्थ प्रसिद्ध आहे. त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता.

जेव्हा धोनीचे रांचीमध्ये आगमन होते तेव्हा भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने. कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला. 

भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ रांचीच्या विमानतळावर दाखल झाला होता. ते काही काळ विमानतळावर गाड्यांची वाट पाहत होते. भारतीय संघातून पहिला विमानतळावरून बाहेर पडला तो रिषभ पंत. पण पंतनंतर बाहेर पडला तो रांचीचा लाडका सुपूत्र धोनी. विमानतळावर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

धोनीचं डोकं चालतं लय भारी, केदार-विराटही झाले चकित!महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यात कधी काय चालेल, हे सांगता येत नाही. तो एक अवलिया आहे. तो स्वत: नेमकं काय करतो, हे कोणालाही कळत नाही. दुसरीकडे समोरचा खेळाडू काय करणार आहे, हे तो उत्तमपणे जाणतो. या गोष्टीचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आला.

भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण विजय शंकरने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉइनिसचा अडसर दूर केला. तो बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर शंकरने अॅडम झाम्पाला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात धोनीने अशी एक गोष्ट केली, सर्व चकित झाले. ही गोष्ट घडली ती 33व्या षटकात. केदार जाधव हा 33वे षटक टाकत होता. चेंडू कसा टाकायचा हे सल्ले तो केदारला देत होता. केदारने एक चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. त्यावेळी फलंदाज नेमका कोणता फटका मारणार, हे धोनीला कळून चुकले होते. धोनी ऑफ स्टम्पच्या बाहेर उभा होता. फलंदाज आता पॅडल स्विप मारणार, हे धोनीला समजले. चपळ धोनी तिथून थेट लेग स्लिपच्या जागेपर्यंत पोहोचला. फलंदाजही पॅडल स्विप खेळला. लेग स्लिपला गेलेल्या धोनीच्या ग्लोव्ह्जला यावेळी चेंडू लागला. जर हा झेल पकडला गेला असता तर तो आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल ठरला असता. धोनीची ही गोष्ट पाहिल्यावर कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवही चकित झाले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया