रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आतापर्यंत बरेच विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर केले आहेत. पण आता तर घरच्या मैदानात एक विक्रम धोनीला खुणावत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उद्या रांचीमध्ये होणार आहे.
सध्याच्या घडीला धोनीच्या नावावर 16,967 धावा आहेत. त्यामुळे धोनीने या सामन्यात 33 धावा केल्या तर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावा पूर्ण होऊ शकतात. धोनीने आतापर्यंत 528 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 16 शतकांसहीत 106 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने कसोटीमध्ये 4876, वनडेमध्ये 10474 आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 1617 धावा केल्या आहेत.
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर 34357 धावा केल्या आहेत. त्यानं राहुल द्रविड (24208 रन), विराट कोहली (19453 रन), सौरव गांगुली (18575 रन) और वीरेंद्र सहवाग (17253 रन) यांचा क्रमांक येतो.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रन बनवणारे भारताचे फलंदाज
सचिन तेंडुलकर-34357 रन
राहुल द्रविड-24208 रन
विराट कोहली-19453 रन
सौरव गांगुली-18575 रन
वीरेंद्र सेहवाग-17253 रन
धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान
रांची या छोट्याश्या शहराला ओळख मिळवून दिली ती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने. भारताचा तिसरा सामना रांचीला होणार आहे. रांचीला आल्यापासून धोनी एकदम मस्तीमध्ये वावरत असल्याचे दिसत आहे. कारण हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले. आता तर धोनीने टीम इंडियाला 'लिट्टी-चोखा' पार्टी दिल्याचेही समोर आले आहे.
बुधवारी रात्री धोनीने आपल्या सात एकराच्या फार्म हाऊसमध्ये टीम इंडियाला पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पार्टीमध्ये खास पदार्थ होता तो 'लिट्टी-चोखा'. उत्तर प्रदेश, झारखंड या भागांमध्ये 'लिट्टी-चोखा'हा पदार्थ प्रसिद्ध आहे. त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता.
जेव्हा धोनीचे रांचीमध्ये आगमन होते तेव्हा
भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने. कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला.
भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ रांचीच्या विमानतळावर दाखल झाला होता. ते काही काळ विमानतळावर गाड्यांची वाट पाहत होते. भारतीय संघातून पहिला विमानतळावरून बाहेर पडला तो रिषभ पंत. पण पंतनंतर बाहेर पडला तो रांचीचा लाडका सुपूत्र धोनी. विमानतळावर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
Web Title: India vs Australia: ms Dhoni is ready to make record in home ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.