India vs Australia : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता

India vs Australia: महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद नसले तरी संघात त्याला महत्त्वाचे स्थान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 06:05 PM2019-03-01T18:05:56+5:302019-03-01T18:06:24+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: MS Dhoni suffers injury scare ahead of India-Australia 1st ODI at Hyderabad | India vs Australia : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता

India vs Australia : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद नसले तरी संघात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला अनेकदा फायदा झालेला आहे. 2018 मध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती आणि त्यामुळे 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतून त्याला वगळण्यात यावं, अशी मागणी होत होती. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने सलग तीन अर्धशतक झळकावताना मॅन ऑफ दी सीरिजचा किताब पटकावला. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने आणखी मोठी खेळी करावी, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. पण, शनिवारी होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला धोनीला दुखापत होता होता बचावला.



शुक्रवारी भारतीय संघाने नेटमध्ये कसून सराव केला. धोनीनंही जोरदार फटकेबाजी केली. त्याने संघाचा साहाय्यक रघुवेंद्र यांच्यासोबत सराव केला. सराव करताना एक चेंडू धोनीच्या हाताला लागला. त्यानंतर धोनीनं सरावातून सुट्टी घेतली आणि विश्रांती घेतली. धोनीच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनानं अद्याप काहीही सांगितलेले नाही. जर धोनी उद्याच्या सामन्यात खेळला नाही, तर यष्टिमागे रिषभ पंत दिसू शकतो आणि कोहली लोकेश राहुल किंवा सिद्धार्थ कौल यांनाही खेळवू शकतो. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड मालिकेतही धोनाली दुखापत झाली होती.  

... तर मोहालीत होणारा चौथा सामना अन्य ठिकाणी हलवणार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याची तणावाची परिस्थिती लक्षात घेता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेतील चौथ्या सामन्याचे स्थळ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) सुरक्षेच्या कारणास्तव  मोहाली येथे होणारा हा सामना दुसरीकडे हवण्याच्या तयारीत आहे. 10 मार्च येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना होणार होता, परंतु हा सामना लखनौ किंवा राजकोट येथे खेळवण्यात येईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिका शनिवारपासून सुरू होत आहे. पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. 

 

Web Title: India vs Australia: MS Dhoni suffers injury scare ahead of India-Australia 1st ODI at Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.