रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार आहे, अशी माहिती भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली. त्यामुळे धोनीचा रांची येथे झालेला सामना धोनीचा भारतातील अखेरचा असल्याचे म्हटले जात आहे. कारण विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार असल्याचे म्हटले जात आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या मालिकेनंतर भारतामध्ये विश्वचषकापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार नाही. त्यामुळे धोनीला विश्वचषकापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता येणार नसल्याचे म्हटले जात आहे. विश्वचषक हा इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी भारतामध्ये आयॉपीएल खेळवली जाणार आहे. पण आयपीएलला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा नसतो. त्यामुळे रांचीमधील धोनीचा अखेरचा देशातील सामना होता, असे म्हटले जात आहे.
विश्वचषकानंतर रांचीमध्ये धोनीसाठी एक आंतरराष्ट्रीय सामना ठेवण्यात यावा, अश स्थानिक क्रिकेट मंडळाने बीरीसीआयकडे मागणी केली आहे. पण धोनी कधी कोणते पाऊल उचलून धक्का देईल, हे कोणालाही सांगता येणार नाही. कारण कसोटी क्रिकेटमधूनही धोनीने साऱ्यांना धक्का देत निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे विश्वचषकामध्ये धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली तर त्याला भारतामध्ये यापुढे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता येणार नाही.
विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन तेरा वाजले. कोहलीने 123 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला झटपट तीन धक्के बसले. त्यानंतर कोहली आणि महेंद्रिसिंग धोनी यांनी संघाला स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी 26 धावांवर बाद झाला. धोनी बाद झाल्यावर कोहलीने केदार जाधवबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण केदार बाद झाल्याने हा प्रयत्नही अपयशी ठरला. कोहलीने 16 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 123 धावा केल्या. कोहलीचे हे 41वे शतक ठरले.
Web Title: India vs Australia: ms Dhoni's last match in India which was played in ranchi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.