मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली. पण या सामन्यारदम्यान ११ व्यक्तींना पोलीसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिली. रोहितनं खणखणीत शतक करताना टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. त्याला विराट कोहलीनं सुरेख साथ दिली आणि टीम इंडियानं हा सामना जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.
रोहित आणि विराट जोडीनं त्यानंतर दमदार खेळ करताना शतकी भागीदारी केली. रोहितनं 110 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील रोहितचे हे 29वे शतक ठरले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं आठव्यांदा शतकी खेळी केली आहे. विराटनंही 61 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 37व्या षटकात रोहित-विराट यांची जोडी तुटली. अॅडम झम्पानं शतकवीर रोहितला बाद केले. रोहित 128 चेंडूंत 8 चौकार व 6 षटकार खेचून 119 धावांवर माघारी परतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. या सामन्यावर या ११ जणांनी सट्टा लावला होता. या सामन्यावर एकूण २ कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला होता. क्राइम ब्रांचने अकरा लोकांना अटक केली. या ११ जणांकडे तब्बल ७० मोबाईल. २ टीव्ही आणि सात लॅपटॉप जप्त करण्यात आले.
वन डे क्रिकेटमधील रोहितचे हे 29वे शतक ठरले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं आठव्यांदा शतकी खेळी केली आहे. या सह त्यानं सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 8 शतकं करण्याचा विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध, तर विराटनं श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.