Join us  

IND vs AUS : पृथ्वी शॉ, हनुमा विहारी चमकले; भारताच्या 358 धावा 

India vs Australia : कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या वाट्याला एक सराव सामना आला, परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 3:03 PM

Open in App
ठळक मुद्देभारताच्या पाच खेळाडूंचे अर्धशतकभारताच्या पहिल्या डावात 358 धावा लोकेश राहुलला अपयश, अवघ्या तीन धावांत माघारी

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या वाट्याला एक सराव सामना आला, परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. मात्र गुरुवारी अखेरीस भारतीय फलंदाजांना सरावाची संधी मिळाली. भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दुसऱ्या दिवशी 92 षटकांत 358 धावा केल्या. दुसरा दिवस भारताच्या पृथ्वी शॉ, हनूमा विहारी, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीने चर्चेत राहिला. पृथ्वीने आपल्या आक्रमक फलंदाजीने पुन्हा एकदा प्रभावित केले. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या. दिवसअखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 24 धावा झाल्या आहेत.लोकेश राहुलला पुन्हा एकदा अपयश आले आणि त्यामुळे कसोटी संघात त्याला स्थान द्यायचे की नाही, याचा विचार सुरु झाला आहे. जॅक्सन कोलमन याने भारताला पहिला धक्का दिला. सहा षटकांत भारताच्या 1 बाद 16 धावा झाल्या होत्या. पृथ्वीने भारताचा डाव सावरला. त्याने चेतेश्वर पुजारासह 80 धावांची भागीदारी केली. 21 व्या षटकात पृथ्वीला डॅनियल फॉलीन्सने त्रिफळाचीत केले.कोहलीने तिसऱ्या विकेटसाठीपुजारासह 73 धावांची भागीदारी केली. कोहली आणि रहाणे यांनी 35 धावा जोडल्या. ॲरोन हार्डीने कोहलीला बाद केले. त्यानंतर विहारीने दमदार खेळ केला. इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक करणाऱ्या विहारीने 53 धावांची खेळी करून कसोटी संघासाठी दावेदारी मजबूत केली. हार्डीने चार विकेट घेतल्या. कोलमन, फॉलिन्स, डी आर्सी शॉर्ट आणि ल्युक रॉबीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापृथ्वी शॉविराट कोहलीअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा