मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या विजयाबरोबर भारताने मालिकेतील आव्हान कायम राखलेच, शिवाय कसोटीपाठोपाठ वन डे मालिका जिंकण्याच्या दिशने पाऊल टाकले आहे. अॅडलेडवरील विजयानंतर भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटला. हिटमॅन रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी बुधवारी ऑस्ट्रेलिया ओपनच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली. रोहितने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 299 धावांचे लक्ष्य भारताने सहा विकेट राखून पूर्ण केले. कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या अर्धशतक यांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. या सामन्यात कोहलीने 104 धावा चोपल्या, तर धोनी नाबाद 55 धावा केल्या. धोनीने सलग दुसऱ्या वन डेत अर्धशतक झळकावले, परंतु सिडनी वन डेच्या तुलनेत हे अर्धशतक जलद ठरले. सिडनीत धोनीने 96 चेंडूंत 51 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताच्या पराभवाला त्याला जबाबदार धरण्यात आले होते, परंतु अॅडलेडवर धोनीनं सर्वांना गप्प केलं. त्याने 54 चेंडूंत दोन षटकारांसह 55 धावा केल्या.