भारतीय संघानं 2020च्या पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला पराभवाची चव चाखवली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया नववर्षातील पहिल्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाचा तगड्या ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. मंगळवारपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे आणि पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पण, या सामन्यात स्थानिक खेळाडू रोहित शर्माच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सामन्यापूर्वी सराव करताना रोहितला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
India vs Australia : टीम इंडियाला नमवण्यासाठी कांगारूंचा मास्टर प्लान; उतरवणार हुकुमी एक्का
सराव करताना रोहिच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यानं सरावातून विश्रांती घेतली. रोहितच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या चमूत चिंतेचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही रोहित मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीही त्याला दुखापत झाली होती.
इंडिया टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान रोहितच्या डाव्या डाताच्या अंगठ्यावर चेंडू आदळला. त्यानंतर फिजिओ नितीन पटेल त्याच्या दुखापतीची पाहणी करत आहेत. त्याच्या या दुखापतीची अधिक माहिती कोणी दिलेली नाही. या दुखापतीमुळे रोहितला हातात पेनही पकडता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत रोहित चाहत्याला स्वाक्षरी देत आहे आणि त्यात त्याच्या अंगठ्यावर पट्टी लागलेली दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अॅडम झम्पा.
भारत - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह
वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू