सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवले असे चित्र होते, परंतु लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी झटपट विकेट गमावून संघाला अडचणीत आणले. त्यांच्या या ढिसाळ खेळीवर भारतीय संघाचे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी सडकून टीका केली आहे. पंत आणि राहुल यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे कृणाल पांड्याला फलंदाजीत छाप पाडता आली नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे या दोघांना संघात खेळवू नका, अशी मागणी मांजरेकर यांनी संघ व्यवस्थापनाकडे केली आहे. त्याने ट्विटरवरही याबाबत लोकांचे मतही मागितले.
IND vsAUS : स्मिथ-वॉर्नरदेणारऑसीगोलंदाजांना'विराट'सेनेला रोखण्याचा'मंत्र'https://t.co/chU5POKKFM@BCCI@imVkohli@CAComms#AUSvIND ''राहुल आणि पंत यांना फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. भारतातही हेच चित्र दिसले. संघात कृणाल पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. भारतीय संघाने ट्वेंटी-20त चहलला खेळवले पाहिजे होते आणि कृणालला फलंदाज म्हणून संधी द्यायला हवी होती. तुम्हाला काय वाटते?,'' असे मांजरेकर यांनी ट्वीट केले आहे.