IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला विजयाचा मंत्र देण्यासाठी आलेल्या स्टीव्हन स्मिथचे लोटांगण

India vs Australia : भारतीय संघाशी दोन हात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या मदतीला धावलेला स्टीव्हन स्मिथची फजिती झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:04 PM2018-11-27T12:04:17+5:302018-11-27T12:05:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : Steve Smith faces Australian pacers in nets; loses balance, falls down | IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला विजयाचा मंत्र देण्यासाठी आलेल्या स्टीव्हन स्मिथचे लोटांगण

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला विजयाचा मंत्र देण्यासाठी आलेल्या स्टीव्हन स्मिथचे लोटांगण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघाशी दोन हात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या मदतीला धावलेल्या स्टीव्हन स्मिथची फजितीनेटमध्ये सरावादरम्यान पुल मारताना पडला जमिनीवरभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाशी दोन हात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या मदतीला धावलेला स्टीव्हन स्मिथची फजिती झाली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी स्मिथ व डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सहकार्य करत आहेत. या दोघांनी नेटमध्ये बॅटींग करताना ऑसी गोलंदाजांचा सराव करून घेतला, परंतु सरावादरम्यान स्मिथ पडल्याने तो विनोदाचा विषय ठरत आहे.

या मालिकेत त्यांना खेळता यावे यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्यावरील बंदी हटवण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे स्मिथ व वॉर्नर ऑसी गोलंदाजांना मार्गदर्शन करत आहेत. दोघांनी नेट्समध्ये कसून फलंदाजी केली आणि ऑसी गोलंदाजांकडून चांगलीच मेहनत करून घेतली. सरावादरम्यान मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न करताना स्थिम जमिनीवर कोसळला. त्याने लगेच स्वतःला सावरले आणि पुन्हा फलंदाजीला लागला. 


 
या मालिकेपूर्वी स्मिथला ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्यासोबत ब्रेकफास्ट करताना पाहिले गेले. तेथेही या दोघांमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: India vs Australia : Steve Smith faces Australian pacers in nets; loses balance, falls down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.