India vs Australia, 4th Test Day 4 : मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑस्ट्रेलियन संघाला दणके दिले. ३३ धावांच्या पहिल्या डावाच्या आघाडीत ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसात २९४ धावांची भर घातली. खेळपट्टीनं तिचे स्वरूप बदलल्यानं चेंडूला अनपेक्षित उसळी मिळत होती. याचाच फायदा उचलत सिराज व शार्दूलनं टीम इंडियाला यश मिळवून दिले. आता पाचव्या दिवशी कांगारूंच्या अव्वल गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल नक्की कोणाच्या पारड्यात पडेल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम; जसप्रीत बुमराहची जादूची झप्पी, Video
सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. खेळपट्टीवर सेट झालेल्या डेव्हिड वॉर्नर ( ४८) व मार्कस हॅरीस ( ३८) या सलामीवीरांना अनुक्रमे वॉशिंग्टन सुंदर व शार्दूल यांनी माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी चिवट खेळ केला, परंतु कर्णधार अजिंक्यनं हुकमी अस्त्र सिराजच्या हाती चेंडू सोपवला. त्यानं एकाच षटकात ऑसींनच्या लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना बाद केले. यानंतर शार्दूल ठाकूरनं ऑसींना धक्का दिला. कॅमेरून ग्रीन ( ३७) ठाकूरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 'हा' फोटो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबद्दल बरंच काही सांगतो; मोहम्मद सिराजला दिला विशेष मान
पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही काळ थांबला होता. त्यानंतर शार्दूल व सिराज यांनी ऑसींना धक्का देण्याचे सत्र कायम ठेवले. पॅट कमिन्स एकाबाजूनं फटकेबाजी करत ऑसींची आघाडी वाढवत होता आणि त्यानं नाबाद २८ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियाला आता विजयासाठी ३२८ धावा कराव्या लागतील. पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ २३ षटकं आधीच थांबवण्यात आला. भारतानं बिनबाद ४ धावा केल्या आहेत आणि पाचव्या दिवशी मालिका जिंकण्यासाठी त्यांना ३२४ धावा कराव्या लागतील. रोहित शर्माच्या 'शॅडो' फलंदाजीकडे स्टीव्ह स्मिथचे बारीक लक्ष, Video