Join us  

विश्रांती नाहीच! वन डे वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ दुसऱ्या 'मिशन'च्या तयारीला लागणार

वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ अधिकाधिका वन डे सामने खेळण्यावर भर देणार आहे. पण, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्वरित भारतीय संघ दुसऱ्या मिशनच्या तयारीला लागणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 12:33 PM

Open in App

रोहित शर्मा अँड टीमचं सध्या वन डे वर्ल्ड कप जिंकून भारताचा दहा वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्याचं लक्ष्य आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. त्यानंतर आयर्लंड दौरा( ट्वेंटी-२०),  आशिया चषक( वन डे) , ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्याविरुद्धची वन डे मालिका खेळणार आहेत. वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ अधिकाधिका वन डे सामने खेळण्यावर भर देणार आहे. पण, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्वरित भारतीय संघ दुसऱ्या मिशनच्या तयारीला लागणार आहे. 

ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून होईल. भारतीय संघ डिसेंबरमध्ये आफ्रिका दौऱ्यावर आहे. तिथून परतल्यावर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका भारत खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.  त्यानंतर बांगलादेश ( २) आणि न्यूझीलंड ( ३) अशा पाच कसोटी मॅच भारतात होणार आहेत. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचं वेळापत्रक ( अंदाजित)

  • डिसेंबर - भारत वि. अफगाणिस्तान - ३ ट्वेंटी-२० सामने 
  • डिसेंबर - जानेवारी - भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा ( २ कसोटी, ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०)
  • जानेवारी-मार्च - इंग्लंडचा भारत दौरा ( ५ कसोटी)  
  • जुलै - भारताचा श्रीलंका दौरा ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०  
  • सप्टेंबर- ऑक्टोबर - बांगलादेशचा भारत दौरा ( २ कसोटी व ३ ट्वेंटी-२०)  
  • ऑक्टोबर - नोव्हेंबर - न्यूझीलंडचा भारत दौरा ( ३ कसोटी)

 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचे सर्व लक्ष्य हे ट्वेंटी-२० व कसोटी क्रिकेट असणार आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवा खेळाडूंसह उतरण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App