Ind vs Aus, Controversial Statement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे 'माईंड गेम' खेळण्यात पटाईत आहेत. त्यामुळेच दोन्ही संघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान हिलीने भारताने 'विश्वासघात' केला असल्याचा धक्कादायक आरोप केला. मालिकेपूर्वी भारतात सरावासाठी ज्या खेळपट्ट्या दिल्या जातील, त्या खेळपट्ट्या आणि सामन्यादरम्यान असलेल्या खेळपट्ट्या समान नसतील, असा एक खोचक टोला इयान हिलीने लगावला आहे.
उस्मान ख्वाजाने नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्याबाबतच्या अनुभवावर वक्तव्य केल्यावर ऑस्ट्रेलियाच्या माजी यष्टीरक्षकाचे हे वक्तव्य आले. उस्मान ख्वाजाला विचारण्यात आले होते की, भारता विरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ कोणताही सराव सामना का खेळत नाही? त्यावर उस्मान म्हणाला की त्याचा काही उपयोग नाही, कारण सामन्यातील खेळपट्टी आणि सराव खेळपट्टीमध्ये खूप फरक आहे, मग सराव करून काय उपयोग?
इयान हिलीने या विधानाचे समर्थन करत सांगितले की, आम्ही सिडनीमध्ये फिरकी ट्रॅक तयार केला आहे, जेणेकरून भारत दौऱ्याची तयारी करता येईल. आम्ही तिथे ज्या प्रकारची सराव खेळपट्टी मागितली आहे ती मिळवू शकू यावर आम्हाला विश्वास नाही. मालिकेवर वेगवेगळ्या प्रकारची खेळपट्टी तयार करून सराव खेळपट्ट्या कराव्यात, याचे अजिबात समर्थन करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. दोन क्रिकेट राष्ट्रांमधील अशा प्रकारचा अविश्वास हा चिंतेचा विषय असल्याचेही तो म्हणाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. चार सामन्यांमध्ये होणारी ही शेवटची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असेल. टीम इंडियाला मायदेशात पराभूत करणे खूप कठीण आहे, त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला २००४-०५ पासून भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
Web Title: India vs Australia test series Ian Healy controversial comment on practice pitches difference of India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.