रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उद्या रांचीमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात, असे संकेत भारतीय संघाच्या सरावाच्यावेळी मिळाले आहेत. विश्वचषक स्पर्धा पाहता संघात हे दोन बदल करण्यात येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
भारताचा संघ बुधवारी रांचीमध्ये दाखल झाला. त्यानंतर रांचीचा लाडका महेंद्रसिंग धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना आपल्या हमर या गाडीमध्ये सैर घडवली. त्यानंतर धोनीने आपल्या फार्महाऊसवर टीम इंडियासाठी एक खास पार्टी ठेवली होती. त्यानंतर भारतीय संघ गुरुवारी दुपारी मैदानात सराव करण्यासाठी उतरला होता.
सराव करताना पहिल्यांदाच भुवनेश्वर कुमार टीम इंडियाबरोबर बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळाला. भुवनेश्वरने यावेळी गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जसप्रीत बुमराऐवजी भुवनेश्वरला संधी देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. भुवनेश्वरबरोबर रिषभ पंतही यावेळी सरावात सामील झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे पंतलाही तिसऱ्या सामन्यात संधी मिळेल, असे म्हटले जात आहे. पण पंतला कोणाच्या जागी संधी द्यायची, हा संघ व्यवस्थापनापुढे मोठा प्रश्न असेल.
धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान
रांची या छोट्याश्या शहराला ओळख मिळवून दिली ती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने. भारताचा तिसरा सामना रांचीला होणार आहे. रांचीला आल्यापासून धोनी एकदम मस्तीमध्ये वावरत असल्याचे दिसत आहे. कारण हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले. आता तर धोनीने टीम इंडियाला 'लिट्टी-चोखा' पार्टी दिल्याचेही समोर आले आहे.
बुधवारी रात्री धोनीने आपल्या सात एकराच्या फार्म हाऊसमध्ये टीम इंडियाला पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पार्टीमध्ये खास पदार्थ होता तो 'लिट्टी-चोखा'. उत्तर प्रदेश, झारखंड या भागांमध्ये 'लिट्टी-चोखा'हा पदार्थ प्रसिद्ध आहे. त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता.
जेव्हा धोनीचे रांचीमध्ये आगमन होते तेव्हा
भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने. कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला.
भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ रांचीच्या विमानतळावर दाखल झाला होता. ते काही काळ विमानतळावर गाड्यांची वाट पाहत होते. भारतीय संघातून पहिला विमानतळावरून बाहेर पडला तो रिषभ पंत. पण पंतनंतर बाहेर पडला तो रांचीचा लाडका सुपूत्र धोनी. विमानतळावर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
Web Title: India vs Australia: Two players, who can come to the Indian squad for the third ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.