माऊंट माऊंगानुई : भारतीय गोलंदाजांच्या धमाकेदार माऱ्यानंतर अंडर 19 विश्वचषकात भारतालासमोर विजयासाठी २१७ धावांचं आव्हान आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. इशान पोरेल आणि कमलेश नागरकोटीच्या पहिल्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची जोडी तंबूत पाठविली. त्यानंतर जोनाथन मेरलो आणि परम उप्पल यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेल्याचा डाव सावरला. जोनाथन मेरलोने 76 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला,पण त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. मेरलो आऊड झाल्यानंतर मैदानात आलेले फलंदाज काही मिनिटांमध्येच तंबूत परतले.
भारताकडून इशान पोरेल, शिवा सिंह, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. शिवम मवीने एका फलंदाजाला माघारी धाडलं आणि एक फलंदाज भारतीय क्षेत्ररक्षकांमुळे रनआऊट झाला.
- भारताला दुसरा धक्का- शुभमन गिल 31 धावांवर माघारी.
- भारताला पहिला धक्का. पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद. भारतासमोर 217 धावांचं लक्ष्य. विल सदरलँडकडून भारताचा पहिला धक्का.
- पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरू.
- अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय. चार ओव्हरनंतर पावसामुळे सामना थांबला. सामना थांबायच्या आधी भारत- 23/0. मनजोतच्या 9 धावा तर पृथ्वी शॉच्या 10 धावा.
- भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
- ऑस्ट्रेलिया 216 धावांवर सर्वबाद, भारतासमोर 217 धावांचं आव्हान
-ऑस्ट्रेलियाला नववा धक्का. बोल्ड रनआऊट.
- ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का. झॅक इव्हान्स बाद.
- ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का. मेर्लो 76 धावांवर बाद.
- ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का. विल सदरलँड बाद.
- ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का. मॅकस्वीनी बाद.
- अनुकूल रॉयने ऑस्ट्रेलियाला दिला चौथा धक्का. परम उप्पल आऊट.
- कर्णधार जेसन संघा माघारी, ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट
- ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, ईशानने घेतली एडवर्डसची विकेट
- ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांनी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत प्रत्येकी तीनदा विजेतेपदाचा मान मिळविला आहे. त्यामुळे हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा व अटीतटीचा होईल यात शंका नाही. द्रविडच्या युवा ब्रिगेडला फायनल जिंकून चौथ्या जेतेपदावर मोहर उमटविण्याची मोठी संधी आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात जेतेपद मिळाल्यास मोहम्मद कैफ(२००२), विराट कोहली(२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांच्यानंतर तो चौथा यशस्वी कर्णधार बनेल. सध्याचा फॉर्म बघता भारताचे पारडे जड वाटते. भारताने आतापर्यंत पाच सामने जिंकले असून पाकवर सर्वांत मोठा २०३ धावांनी विजय साजरा केला. पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला देखील १०० धावांनी पराभूत केले होते. आतापर्यंतच्या विजयात सामूहिक प्रयत्नांचा वाटा राहिला. सर्वच खेळाडूंनी विजयात योगदान दिले. दुसरीकडे भारताकडून पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाने सलग चार विजय नोंदविले आहेत.