ठळक मुद्देविराट कोहलीने सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केलीऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणतो कोहलीची बॅट तळपणार नाहीभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 डिसेंबरपासून
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले. कोहलीने 87 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 64 धावांचा खेळ केला. कोहलीने ही खेळी करून आगामी कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशारा दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही कोहलीची बॅट तळपेल, असा त्याच्या चाहत्यांना विश्वास आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पाँटिंग याने कसोटी मालिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू नसेल, असे भाकित केले आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या मालिकेत धावांचा रतीब घालेल, अशी भविष्यवाणी पाँटिंगने केली.
तो म्हणाला,''ख्वाजा हा कसोटी क्रिकेटमधील कसलेला फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तो भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऑस्ट्रेलिया संघासाठी तो हुकूमाचं पानं आहे. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल आणि मालिकावीरचा पुरस्कारही तोच पटकावेल.''
ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यात ख्वाजाने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीत 85 व 141 धावांची खेळी केली होती. मात्र, त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या कसोटी संघातील समावेशाबद्दल साशंकता होती. निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवत भारताविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड केली. " तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर निवड समितीने दाखवलेल्या विश्वासावर तो खरा उतरला होता. त्या दौऱ्यावर त्याने कमावलेला विश्वास भारताविरुद्धच्या मालिकेत कामी येणार आहे. या मालिकेत त्याचाच दबदबा जाणवेल,'' असेही पाँटिंग म्हणाला.
Web Title: India vs Australia: Usman khawaja will score more runs than Virat kohli in test series, Ricky Ponting believes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.