Join us  

IND vs AUS : अन् विराट कोहली चक्क चड्डीवर टॉस उडवायला आला, नेटिझन्सला मिळाला विषय

India vs Australia: भारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्या. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतक झळकावत कसोटी संघासाठी दावेदारी सांगितली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 3:24 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्यापृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांचे अर्धशतक

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्या. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतक झळकावत कसोटी संघासाठी दावेदारी सांगितली. त्यांच्या खेळीचे कौतुक होत आहेच, परंतु सोशल मीडियावर सध्या कोहलीने केलेल्या त्या कृत्याची चर्चा रंगली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगलाच सराव केला. सामन्याच्या नाणेफेक करण्यासाठी कोहली चक्क चड्डीवर आल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. 

चार दिवसांचा हा सराव सामना बुधवारपासून सुरू होणे अपेक्षित होते, परंतु पहिला दिवस पावसाने वाया घालवला. पहिल्या दिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे गुरुवारी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक करायला मैदानावर आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लोकेश राहुल वगळता भारताच्या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. रोहित शर्मानेही 40 धावांची खेळी केली. मात्र, सोशल मीडियावर चर्चा रंगली ती कोहलीच्या हाफ चड्डीची... भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दुसऱ्या दिवशी 92 षटकांत 358 धावा केल्या. दुसरा दिवस भारताच्या पृथ्वी शॉ, हनूमा विहारी, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीने चर्चेत राहिला. पृथ्वीने आपल्या आक्रमक फलंदाजीने पुन्हा एकदा प्रभावित केले. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या. दिवसअखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 24 धावा झाल्या आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय