सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा, हा भारताचा सर्वात शांत खेळाडू. बचाव हे सर्वात चांगले अस्त्र असते हे त्याने आतापर्यंत बऱ्याचदा दाखवून दिले आहे. पुजारा कधीही कोणाला नावं ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीचा संयमाने सामना करतो. पुजाराच्या स्वभावाविरुद्ध आहे तो भारताचा कर्णधार विराट कोहली. कोहली आक्रमकपणामुळे बऱ्याचदा टीकेचा धनीही ठरला आहे. आता तर त्याने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या पुजारालाच नाव ठेवले आहे.
पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा केल्या होत्या. चार कसोटी सामन्यांमध्ये पुजाराने 521 धावा करत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. पुजारा जर एवढी चांगली कामगिरी करत असेल तर त्याला कोहलीने नाव का ठेवले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
कसोटी मालिकेनंतर कोहलीने पुजाराला 'व्हाईट वॉकर' असे नाव ठेवले आहे. पुजारा हे नाव का ठेवले, याचा खुलासा दस्तुरखुद्द कोहलीने केला आहे. याबाबत कोहली म्हणाला की, " पुजारामध्ये अद्वितीय अशी गुणवत्ता आहे. त्यामुळे त्याला कोणताही गोलंदाज किंवा चेंडू धोका पोहोचवू शकत नाही. क्रिकेटच्या मैदानात पुजाराला तोड नाहीच. त्यामुळेच त्याला 'व्हाईट वॉकर' हे नाव मी ठेवले आहे."
Web Title: India vs Australia : Virat Kohli compares Cheteshwar Pujara with Game of Thrones character White Walker
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.