ठळक मुद्देभारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णयविराट कोहली वगळता आघाडीचे चारही फलंदाज अपयशीटीम इंडियाचा निम्मा संघ १५२ धावांवर माघारी
वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीनंतर तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) बाजूने पडला आणि त्यानं त्वरीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवालला ( Mayank Agarawal) विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. टीम इंडियानं आजच्या सामन्यात चार बदल केले. टी नटराजननं वन डे संघात पदार्पण केले, तर शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांनीही अंतिम अकरामध्ये स्थान पटकावले. नवदीप सैनी, मोहम्मद शमी, मयांक आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अॅबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अॅश्टन अॅगरनं सोपा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या विराटनं २३वी धाव घेताना विक्रमाला गवसणी घातली. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२००० धावांचा विक्रम विराटनं नावावर केला. विराट-शुबमन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला सावरलं. पण, अॅश्टन अॅगरनं शुबमनला ( ३३) पायचीत करून ही भागीदारी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला.
लोकेश राहुलनेही निराश केलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीच्चून मारा करताना भारताच्या धावगतीवर लगाम लावताना फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. राहुल ५ धावांवर पायचीत झाला. विराट हा एकमेव आशास्थान टीम इंडियासाठी मैदानावर होता. पण, जोश हेझलवूडनं त्याची विकेट काढली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला. हेझलवूडनं चौथ्यांदा विराटला बाद केले. कॅलेंडर वर्षात २००९नंतर प्रथच विराटला वन डे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. वन डे क्रिकेटमधील पदार्पणानंतर दुसऱ्यांदा कॅलेंडर वर्षात विराट शतक झळकावण्यात अयपशी ठरला आहे. विराटनं १४ ऑगस्ट २०१९मध्ये अखेरचे वन डे शतक झळकावले आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ चेंडूंत नाबाद ११४ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीची वन डे क्रिकेटमधील ( शतक) कॅलेंडर वर्षातील कामगिरी
2008 - 0
2009 - 1
2010 - 3
2011 - 4
2012 - 5
2013 - 4
2014 - 4
2015 - 2
2016 - 3
2017 - 6
2018 - 6
2019 - 5
2020 - 0
Web Title: India vs Australia : Virat Kohli for the first time since 2009 ends a calendar year without registering an ODI century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.