अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केले. वन डे मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी मेलबर्नवर होणार आहे आणि दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. अॅडलेडवरील सामन्यात महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही भारतासाठी आणि चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरली. सिडनीतही धोनीने अर्धशतकी खेळी केली होती, परंतु त्याच्या त्या संथ खेळीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला अशी टीका झाली होती. धोनीने अॅडलेडवर त्या सर्वांची तोंड बंद केली. कर्णधार विराट कोहलीनेही धोनीच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
39 वन डे शतकांपेक्षा ही गोष्ट कोहलीसाठी अभिमानास्पदभारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या युजवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांत अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला भलत्याच कामाला लावले आहे. बीसीसीआयने त्याच्या नावानं चहल टीव्ही सुरू केला आहे. त्यात चहलने मंगळवारी कोहलीची छोटेखानी मुलाखत घेतली. वन डेतील 39वे शतक आणि मॅन ऑफ दी मॅच यापेक्षा चहल टीव्हीवर येणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे कोहलीने सांगितले. शिवाय चहल टीव्हीवर येण्यासाठी शतक करा किंवा पाच विकेट मिळवा, असा सल्लाही कोहलीने दिला.
पाहा व्हिडीओ...
http://www.bcci.tv/videos/id/7249/virat-kohli-makes-his-debut-on-chahal-tv