मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तेव्हा तेव्हा त्यांना स्लेजिंगचा सामना करावा लागला. पण यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘नो स्लेजिंग’ नीती वपारण्याचे ठरवले आहे.
ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हटले की सर्वांना मंकीगेट प्रकरण आठवल्यावाचून राहत नाही. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. बीसीसीआयने तर दौरा अर्धवट सोडण्याची ताकिद दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी जेव्हा कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्याला चाहत्यांनी डिवचले होते. त्यानंतर कोहलीनेही बोट दाखवून साऱ्यांची टीका ओढवून घेतली होती. त्यामुळे या दौऱ्यात कोणती घटना घडते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
याबाबत कोहली म्हणाला की, " माझ्यामते स्लेजिंग करावं की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. त्यामुळे कोण कसे वागते, हे आपण ठरवू शकत नाही. पण कोणी काहीही केलं तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही."