मेलबर्न : यजमान देशाकडून सरावासाठी योग्य सुविधा मिळत नसल्यामुळेच पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ आगामी बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेसाठी भारतात एकही सराव सामना खेळणार नाही, असे सांगत ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टिरक्षक इयान हिली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नाराजी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने नुकतेच म्हटले होते की, भारतात सराव सामना खेळण्यात काहीच अर्थ नाही. कारण सराव सामना आणि प्रत्यक्ष सामन्यादरम्यान मिळणारी खेळपट्टी यामध्ये खूप फरक होता. ख्वाजाने या महिन्याच्या सुरुवातीला एका चर्चेत सांगितले होते की, भारतात मालिकेआधी सराव सामन्यादरम्यान ज्या खेळपट्ट्या मिळतात, त्या गाबासारख्या हिरव्या असतात. पण, जेव्हा प्रत्यक्ष सामन्यांना सुरुवात होते तेव्हा या खेळपट्ट्या फिरकीस अनुकूल असतात.
‘हा भरवसा कायम राखला पाहिजे’
हिली यांनी सांगितले की, सर्वोत्तम आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी आणि अनुभव देण्यावरून आपले दुर्लक्ष झाले आहे. आता आपण बहुचर्चित मालिकेसाठी दौऱ्यावर येणाऱ्या संघाला योग्य सुविधा पुरवत नसल्याचे मला आवडत नाही. क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधील हा भरवसा संपुष्टात येत असल्याचे पाहणे निराशाजनक असून, हे थांबविण्याची गरज आहे.
Web Title: India Vs Australia: Visiting team should get proper facilities, Ian Healy on BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.