Join us  

India vs Australia : जेव्हा 'कूल'धोनी केदार जाधववर रागावला होता तेव्हा...

हा चेंडू स्टम्पला लागला असता तर धोनी आऊट झाला असता. त्यानंतर धोनी रागावल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 2:54 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी हा सर्वात कूल असल्याचे सर्वांनाच परिचीत आहे. पण एक प्रसंग असाही घडला होता, की जेव्हा धोनी केदार जाधववर रागावला होता आणि तेही भर मैदानात.

ही गोष्ट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातली. भारताची फलंदाजी सुरु होती. भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर धोनी आणि केदार यांनी भागीदारी रचायला सुरुवात केली. त्यावेळी 21व्या मार्कस स्टॉइनिसच्या षटकातील एक चेंडू धोनी कव्हरच्या दिशेने मारला. त्यानंतर धोनी धाव घेण्यासाठी धावला, अर्ध्या पीचपर्यंत तो आला होता. पण केदारने धाव घेण्यास नकार दिला. त्यावेळी क्षेत्ररक्षकाने थ्रो केला. त्यावेळी धोनी क्रीझमध्ये पोहोचू शकला नाही. पण सुदैव एवढे होते की तो बॉल स्टम्पवर बसला नाही. जर हा चेंडू स्टम्पला लागला असता तर धोनी आऊट झाला असता. त्यानंतर धोनी रागावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर केदारवर दडपण वाढले. त्यामध्ये त्याने एक चुकीचा फटका खेळला आणि तो बाद झाला. पण त्यानंतर धोनीने हार्दिक पंड्याच्या साथीने चांगली भागीदारी रचली. धोनीने या सामन्यात 79 धावांची खेळी साकारली, तर पंड्याने 83 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 281 धावा केल्या आणि सामना 26 धावांनी जिंकला होता. ही गोष्ट आहे 2017. हा सामना झाला होता चेन्नईला. पण त्यानंतर मात्र धोनी आणि केदारची चांगली जोडी जमल्याचे पाहायला मिळाले.

धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, सांगतोय मॅच विनर केदार जाधवशनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा केदार जाधव मॅच विनर ठरला. या सामन्यात केदारने धोनीच्या साथीने अभेद्य शतकी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतर केदारची एक मुलाखत झाली. त्यामध्ये त्याने या भागीदारीचे वर्णन केले. त्याचबरोबर धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, हा विश्वासही त्याने व्यक्त केला.

यापूर्वीही बऱ्याचदा केदार आणि धोनी यांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत. या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळते. याबद्दल केदारला विचारले असता त्याने धोनीवर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले आहे. धोनी जे बोलतो, त्यावर कोणताही विचार मी करत नाही. धोनी नेहमीच योग्य बोलतो. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याचा मान ठेवतो आणि डोळे बंद करून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, असे केदारने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

पाहा खास व्हिडीओ

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीकेदार जाधवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया