हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा केदार जाधव मॅच विनर ठरला. महेंद्रसिंग धोनीची त्याला सुरेश साथ लाभली. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची 4 बाद 99 अशी अवस्था झाली होती. साऱ्यांनाच हा सामना भारत जिंकणार की नाही, याची चिंता होती. पण दुसरीकडे मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली प्रशिक्षक रवी शास्त्री यांना म्हणाला की, ही चांगली गोष्ट आहे. विराटचे हे विधान ऐकून साऱ्यांनाच धक्का बसेल.
याबाबत विराट म्हणाला की, " आम्हाला 237 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळी 4 बाद 99 अशी आमची स्थिती होती. त्यामुळे आता धोनी आणि केदार धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतात, याची आम्हाला उत्सुकता होती. अखेर धोनी आणि केदार यांनी सामना जिंकवून दिला."
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन हे नावाजलेले फलंदाज शंभरी पार होण्यापूर्वीच बाद झाले होते. पण धोनीने केदार जाधवच्यासाथीने भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण केले.
आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. शिखर धवनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर रोहित आणि कोहली यांनी ७६ धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे १५ धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर अंबाती रायुडूही झटपट बाद झाला आणि भारताची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली. त्यानंतर धोनीने केदारला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. केदारने या सामन्यात ८७ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. धोनीने ७२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या.
धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, सांगतोय मॅच विनर केदार जाधवशनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा केदार जाधव मॅच विनर ठरला. या सामन्यात केदारने धोनीच्या साथीने अभेद्य शतकी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतर केदारची एक मुलाखत झाली. त्यामध्ये त्याने या भागीदारीचे वर्णन केले. त्याचबरोबर धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, हा विश्वासही त्याने व्यक्त केला.
यापूर्वीही बऱ्याचदा केदार आणि धोनी यांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत. या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळते. याबद्दल केदारला विचारले असता त्याने धोनीवर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले आहे. धोनी जे बोलतो, त्यावर कोणताही विचार मी करत नाही. धोनी नेहमीच योग्य बोलतो. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याचा मान ठेवतो आणि डोळे बंद करून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, असे केदारने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.