मेलबर्न :ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात 'हिटमॅन' रोहित शर्माला रोखणं अवघड असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने व्यक्त केले. सध्याचा फॉर्म पाहता रोहितचे कसोटी संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
''रोहित शर्मा मेहनती खेळाडू आहे. तो अगदी सहजतेने फलंदाजी करतो. त्याची फटकेबाजी पाहण्याचा आनंद निराळाच असतो. त्याची फटकेबाजी सुरू झाल्यावर भारताच्या विजयाचा मार्ग सुकर होतो. जलदगती आणि फिरकी गोलंदाजीचा तो मोठ्या शिफातीने सामना करतो. त्याने वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं केली आहेत. त्याला रोखणं खरचं अवघड आहे,'' असे मॅक्सवेल म्हणाला.
भारताचा ट्वेंटी-20 मालिकेसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणार पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, उमेश यादव, खलील अहमद.