Join us  

Big News : रवींद्र जडेजा OUT; अंतिम ११मध्ये नसलेला युजवेंद्र चहल गोलंदाजी करणार; जाणून घ्या कारण

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या.

By स्वदेश घाणेकर | Published: December 04, 2020 4:01 PM

Open in App

India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ केली आणि रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) अखेरच्या षटकात फटकेबाजी करून  टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जडेजानं २३ चेंडूंत नाबाद ४४ धावा करताना महेंद्रसिंग धोनीचा २०१२सालचा विक्रम मोडला. फलंदाजी दरम्यान जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनं ग्रस्त केलं होते, तरीही त्यानं फलंदाजी केली. पण, क्षेत्ररक्षणाला त्याच्या जागी युजवेंद्र चहल मैदानावर उतरला आणि जडेजाच्या वाट्याचे चार षटकं चहल टाकणार आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या.

सामन्याच्या अखेरच्या षटकात जडेजाच्या हेल्मेटला चेंडू आदळला आणि आयसीसीच्या नियमानुसार खेळाडू मैदानावर जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू मैदानावर उतरू शकतो. तो गोलंदाजी किंवा फलंदाजीही करू शकतो. या नियमानुसार चहल आता गोलंदाजी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजायुजवेंद्र चहलआयसीसी