India vs Australia,1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही मालिका टीम इंडियासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल (WTC Final 2023) च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी तयार आहे.
ऑस्ट्रेलियाची आतापर्यंत झालेली तयारी आणि त्याच्या बाजूने आलेली विधाने पाहता हा संघ भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीला घाबरला असल्याचे दिसून येतंय. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने आपल्या संघाला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजा खूप धोकादायक ठरू शकतो, असे वॉटसनचे मत आहे.
जडेजा चेंडू वेगाने हवेत फेकतो आणि तो सपाट ठेवतो, असे वॉटसनचे मत आहे. तसेच, त्याची अचूकता खूप चांगली आहे आणि त्यामुळे तो संघासाठी धोकादायक ठरू शकतो. ESPNcricinfo शी बोलताना तो म्हणाला, बॉल टर्न होत नसताना जडेजाला खेळणे जास्त कठीण असते. तो प्रत्येक वेळी अचूक लाईन-लेंथने गोलंदाजी करतो. उजव्या हाताचा फलंदाज म्हणून त्याला खेळवणे खूप अवघड आहे. त्याच्याविरुद्ध टिकून राहणेच नव्हे तर धावा काढण्याचा मार्गही शोधणे फार कठीण असल्याचं मत शेन वॉटसन यांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेवर भारताचे वर्चस्व राहिले आहे. भारताने २०१७, २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका जिंकल्या आहेत. भारताने यंदाच्या चार सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाचा ४-० असा पराभव केला तर त्यांची टक्केवारी ६८.०६ अशी होईल. त्यानंतर WTC फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदाचा सामना होईल.
दरम्यान, भारतीय संघाने २०२३ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका यशस्वीपणे जिंकल्या. आता ९ फेब्रुवारीपासून भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २०२०-२१च्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी कांगारू दाखल झाले आहेत. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमधील त्यांचे स्थान निश्चित केलं आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ आहे.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"