भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यावर हवा प्रदुषणाचे सावट आहे आणि सामना रद्दही होण्याची शक्यता आहे. पण, जर हा सामना झाला, तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी तो ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. आजच्या दिवसभरात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने झाले आणि भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा सामना होणार आहे.
Breaking : भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला सामना मॅच रेफरी रद्द करणार; चाहते निराश होणार?
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 176 धावा केल्या. मार्टिन गुप्तील ( 41) आणि जिमी निशॅम ( 42) यांनी दमदार फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डेवीड मलान ( 39), कर्णधार इयॉन मॉर्गन ( 32) आणि ख्रिस जॉर्डन ( 36) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 155 धावांत तंबूत परतला. न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याला टीम साऊदी, ल्युक फर्ग्युसन आणि इश सोढी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली.