India Vs Bangladesh 1st T20I : आठ प्रयत्नानंतर बांगलादेशनं टीम इंडियाला नमवलं

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांना 148 धावाच करता आल्या. शिखर धवन, रिषभ पंत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 06:08 PM2019-11-03T18:08:47+5:302019-11-03T22:36:32+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Bangladesh, 1st T20I Live Score Updates, Ind Vs Ban Highlights and Commentary in Marathi | India Vs Bangladesh 1st T20I : आठ प्रयत्नानंतर बांगलादेशनं टीम इंडियाला नमवलं

India Vs Bangladesh 1st T20I : आठ प्रयत्नानंतर बांगलादेशनं टीम इंडियाला नमवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांना 148 धावाच करता आल्या. शिखर धवन, रिषभ पंत वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. पण, बांगलादेशच्या गोलंदाजांप्रमाणे टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही खेळपट्टीच्या मदतीचा पुरेपूर फायदा घेतला. पण, सौम्या सरकार -  मुशफिकर रहीम यांनी भारताच्या चमूत तणाव निर्माण केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या हातून सामना खेचून आणला. रहीमनं अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतावर पहिला विजय मिळवून दिला. DRSचा चुकलेला निर्णय भारतासाठी घातकी ठरला. बांगलादेशनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

10:35 PM

10:35 PM

10:34 PM

10:29 PM

10:11 PM

Image

09:51 PM

08:52 PM

08:15 PM

पदार्पणवीर शिवम दुबे 1 धावा करून माघारी परतला. फिरकीपटू अफिफ होसैनने त्याच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत दुबेला माघारी पाठवले. 

08:10 PM

शिखर धवनची मोठे फटके मारताना चाचपडत होता. दुसऱ्या बाजूनं मात्र श्रेयस अय्यरनं आक्रमक पवित्रा घेतला होता. ही जोडी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होती. या दोघांची 34 धावांची भागीदारी अमिनुलने मोडली. त्यानं श्रेयसला 22 धावांवर मोहम्मद नइमच्या हाती झेलबाद केले. भारताच्या 10.2 षटकांत 3 बाद 70 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सर्वांचे लक्ष कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतकडे लागले होते. पंत मात्र मोठे फटके खेळताना चाचपडताना दिसला. पण, शिखर आणि रिषभ यांच्यात ताळमेळ जुळलेच नाही. 15व्या षटकात धवन धावबाद झाला. धवनने 42 चेंडूंत 41 धावा केल्या. 

07:39 PM

07:20 PM

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानं पहिल्या षटकात दोन चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला तंबूत परतावे लागले. शफिऊल इस्लामने त्याला पायचीत ( LBW) केलं. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शिखर धवनच्या सल्ल्यानं रोहितनं DRS घेतला. पण, चेंडू त्याच्या यष्टींचा वेध घेऊन जात असल्याचे दिसले आणि रोहितला माघारी परतावे लागले. रोहित अवघ्या 9 धावांत माघारी परला, परंतु त्यानं या कामगिरीसह एका विक्रमाला गवसणी घातली. रोहितनं या कामगिरीसह कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. 

06:52 PM

06:44 PM

06:41 PM

Image

06:41 PM

Image

06:33 PM

06:33 PM

06:33 PM

06:14 PM

Web Title: India Vs Bangladesh, 1st T20I Live Score Updates, Ind Vs Ban Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.