भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यावरील अनिश्चिततेचे सावट अजूनही कायम आहेत. नवी दिल्लीतील वाढल्या प्रदुषणाची समस्या लक्षात घेता, हा सामना इतरस्त्र हलवावा अशी मागणी होत होती. पण, ऐनवेळी असा आंतरराष्ट्रीय सामना हलवता येणार नाही, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले. हा सामना आज सायंकाळी 7 वाजता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पण, मॅच रेफरी ( सामनाधिकारी) रंजन मदुगले हा सामन्याबद्दल काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता बळावली असल्याची चर्चा आहे. पण, आता बीसीसीआयनंही या सामन्याबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
रविवारी सकाळी दिल्लीत पावसानं हजेरी लावली आहे. त्यात प्रदुषणानं आणखी डोकं वर काढलं आहे. वायु गुणवत्ता निर्देशांक ( Air Quality Index) नुसार शहरातील गुणवत्ता 1164 इतकी आहे, म्हणजे आतापर्यंतची सर्वात निचांक गुणवत्ता नोंद. त्यामुळे हा पहिला सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. रंजन मदुगले हा सामना रद्द झाल्याची घोषणा करू शकतात. कारण, रात्रीच्या सामन्यात दृश्यमानता स्तर ( visibility level ) आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना खेळणे अवघड होऊ शकतो. अशा परिस्थितीत मदुगले कठोर निर्णय घेऊ शकतात. पण, सुधारित आकडेवारीनुसार वायु गुणवत्ता निर्देशांक हा 563 इतकी झाली आहे, परंतु ही गुणवत्ताही अजूनही घातकी आहे.
India vs Bangladesh, 1st T20I : रोहितच्या नेतृत्वाखाली भारत रचणार इतिहास, आजचा सामना आहे खास!