भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यावरील अनिश्चिततेचे सावट अजूनही कायम आहेत. नवी दिल्लीतील वाढल्या प्रदुषणाची समस्या लक्षात घेता, हा सामना इतरस्त्र हलवावा अशी मागणी होत होती. पण, ऐनवेळी असा आंतरराष्ट्रीय सामना हलवता येणार नाही, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले. हा सामना आज सायंकाळी 7 वाजता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पण, मॅच रेफरी ( सामनाधिकारी) रंजन मदुगले हा सामन्याबद्दल काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता बळावली आहे.
रविवारी सकाळी दिल्लीत पावसानं हजेरी लावली आहे. त्यात प्रदुषणानं आणखी डोकं वर काढलं आहे. वायु गुणवत्ता निर्देशांक ( Air Quality Index) नुसार शहरातील गुणवत्ता 1164 इतकी आहे, म्हणजे आतापर्यंतची सर्वात निचांक गुणवत्ता नोंद. त्यामुळे हा पहिला सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. रंजन मदुगले हा सामना रद्द झाल्याची घोषणा करू शकतात. कारण, रात्रीच्या सामन्यात दृश्यमानता स्तर ( visibility level ) आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना खेळणे अवघड होऊ शकतो. अशा परिस्थितीत मदुगले कठोर निर्णय घेऊ शकतात.
ABP Newsच्या माहितीनुसार सामन्यापूर्वी मॅच रेफरी दृश्यमानता स्तर तपासणार आहेत. जर त्यात काही अडचण आढळल्यास सामना रद्द होऊ शकतो. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि ग्राऊंड्समन यांनी सामना होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. धुक्याचा त्रास जाणवू नये अशी प्रार्थना ते करत आहेत. ''शनिवारपर्यंत आमच्यानं होईल तितकी मेहनत घेण्यात आली आहे. तरीही आजचा दिवस हा आणखी चिंता वाढवणारा आहे. दृश्यमानता स्तर आणखी खालावला आहे. आशा करतो की सूर्याचं दर्शन व्हावं आणि धुकं नाहीसे व्हावेत. तसे न झाल्यास सामना होणं अवघड आहे. अशा परिस्थितीत आम्हीही काहीच करू शकत नाही,'' असे दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
उभय संघ यातून निवडणारभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कृणाल पांड्या, खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, राहुल चाहर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.
बांगलादेश : महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथून, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन,अमीन इस्लाम, अराफात सनी, तयाजुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान, शफीउल इस्लाम, अबू हैदर, अल अमीन हुसेन.