Join us  

India vs Bangladesh, 1st T20I : रोहितची बॅट आज तळपली, तर तुटतील अनेक विक्रम; खऱ्या अर्थानं ठरेल 'हिटमॅन'

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 4:16 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा सांभाळणार आहे. रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. वर्ल्ड कप स्पर्धा गाजवल्यानंतर रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येताना धावांचा पाऊस पाडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं मालिकावीराचा पुरस्कार पटकावताना अनेक विक्रमी केळी केल्या होत्या. आता बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याला भीमपराक्रम करण्याची संधी आहे.

नवी दिल्लीत होणाऱ्या सामन्यात आठ षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाही भारतीयाच्या नावावर नसलेला विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची संघी रोहितला आहे.  रोहितच्या खात्यात सध्या एकूण 392 आंतरराष्ट्रीय षटकार आहेत. त्यात 50 षटकांच्या सामन्यातील 232, ट्वेंटी-20तील 109 षटकार आहेत. यात आणखी आठ षटकारांची भर पडल्यास रोहितच्या नावावर मोठा पराक्रम नोंदवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार खेचणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. या क्लबमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 534) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( 476) यांचा समावेश आहे. 

 

ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर 

उभय संघ यातून निवडणारभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कृणाल पांड्या, खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, राहुल चाहर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.

बांगलादेश : महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथून, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन,अमीन इस्लाम, अराफात सनी, तयाजुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान, शफीउल इस्लाम, अबू हैदर, अल अमीन हुसेन.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माख्रिस गेलशाहिद अफ्रिदी