India vs Bangladesh, 1st Test: अरे बापरे हे काय? अजिंक्य रहाणेनं बोलावली तातडीनं वैद्यकीय मदत

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 11:32 AM2019-11-15T11:32:27+5:302019-11-15T11:32:50+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 1st Test: Ajinkya Rahane receives treatment for what could be cramp or a pulled muscle | India vs Bangladesh, 1st Test: अरे बापरे हे काय? अजिंक्य रहाणेनं बोलावली तातडीनं वैद्यकीय मदत

India vs Bangladesh, 1st Test: अरे बापरे हे काय? अजिंक्य रहाणेनं बोलावली तातडीनं वैद्यकीय मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. बांगलादेशच्या अबू जावेदनं भारताला दोन धक्के दिले. त्यानं चेतेश्वर पुजाराला झेलबाद करून माघारी पाठवले. पुजारानं 72 चेंडूंत 9 चौकार लगावत 54 धावा केल्या. त्याचे हे 24 वे अर्धशतक ठरले. त्यानंतर अबू जावेदनं कर्णधार विराट कोहलीलाही पायचीत करून तंबूत पाठवले आणि तेही शून्य धावावर असताना. मागील 11 डावांमध्ये कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालनं भारताचा डाव सावरला. 

बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सौरव गांगुली 2004 च्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर 15 वर्षांनी भारतीय कर्णधारावर ही नामुष्की ओढावली. कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांत कोहलीनं माजी कसोटीपटू कपिल देव यांच्याशी बरोबरी केली आहे. या विक्रमात महेंद्रसिंग धोनी ( 8 वेळा) आणि मन्सूर अली खान पतौडी ( 7 वेळा) आघाडीवर आहेत. कपिल देव आणि कोहली प्रत्येकी 6 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.  

त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेनं झटपट खेळ केला. मयांकनेही फटकेबाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, सामन्याच्या ब्रेकमध्ये रहाणेनं वैद्यकीय मदत बोलावली. रहाणेनं या सामन्यांतून कसोटी क्रिकेटमधील 4000 धावांचा पल्ला ओलांडला.


भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारताच्या गोलंदाजांनी फक्त 150 धावांमध्ये बांगलादेशचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांची दिवसअखेर 1 बाद 86 धावा केल्या. 

Web Title: India vs Bangladesh, 1st Test: Ajinkya Rahane receives treatment for what could be cramp or a pulled muscle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.