भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून इंदूर येथे सुरू आहे. मोहम्मद शमी, आर अश्विन यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेशनं सपशेल शरणागती पत्करली. बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. पण, या सामन्यासाठी बांगलादेशनं केलेली तयारी पाहून तुम्ही त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. बांगलादेशनं या सामन्यापूर्वी कसून तयारी केली आणि त्यांची ही तयारी पाहून ते टीम इंडियासमोर कडवं आव्हान उभं करतील असे वाटले होते. पण, घडले उलटे आणि त्यांच्या तयारीवर जोक्स फिरू लागले.
अशी कोणती तयारी केली होती...ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ इंदूर येथे दाखल झाला. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशनं इतिहास घडवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात कडवी टक्कर दिली. त्यामुळे कसोटीतही त्यांच्याकडून तशीच अपेक्षा होती. पण, घडलं उलटच... या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ 11 नोव्हेंबरला इंदूर येथे दाखल झाला. संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथे त्यांची एका दिवसात चक्क 100 अंडी खाल्ले. येथे येण्याच्या महिनाभर आधीच बांगलादेशनं त्यांच्या जीभेचे चोचल्यांची यादी पाठवली होती. त्यात त्यांनी 100 अंडी व तीन प्रकारचे मासे अशी मागणी केली होती.
तीन प्रकारच्या मास्यांत एलिसा, पॉपलेट आणि झींगा यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी बांगलादेश संघानं लंचमध्ये मासे व भात ही ऑर्डर दिली. त्यानंतर डिनरमध्ये ग्रेवीसह मटन आणि कोंबड्या अशी दावत त्यांनी केली.
टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांचा भेदक मारा; बांगलादेशची शरणागतीबांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी आठ विकेट्स घेतल्या.